Uncategorized

राहुल चव्हाण दलित युवक अत्याचार प्रकरणात टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर क्रांतिकारी संघर्ष सेने चा भव्य निषेध मोर्चा…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शांततेत मोर्चास सुरुवात करण्यात आलीया मोर्चातील प्रमुख मागण्या ॲट्रॉसिटी आरोपीतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा.. ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील सर्व वाहने जप्त करा. यामागील सर्व मोरख्यांची चौकशी करा सखोल चौकशी करा,तसेच कंदर उजनी बॅक वॉटर येते तोडकर यांची जमीन असून त्याच ठिकाणी ते अवैध वाळू व्यवसाय करत होते त्यांची जेसीबी, टिपर आहेत तसेच हे भागीदारी मध्ये इतरांसोबत वाळू व्यवसाय करत होते. परंतु या प्रकरणाचे सात ते आठ लाखाच्या आसपास फोन पे ट्रांजेक्शन वकील तोडकर फोन पे वर ट्रांजेक्शन केलेले पुरावे. तसेच यांचे व अप्रत्यक्षरीत्या वाहने यांच्या नावावर असल्याचे पुरावे हाती लागले असल्याने हे पोलीस प्रशासनाला तपास कामी सत्य समोर येण्यासाठी तात्काळ देण्यात येणार गणेश भाऊ भोसले साहेब, संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना,महाराष्ट्र राज्य यांनी प्रशासनाकडे मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली आहे. गुन्हे खरे आणि खोटे हा ठरवायचा अधिकार न्यायालयाला आहे जो ॲट्रॉसिटीला बदनाम करेल त्याच्यावरती योग्य ती प्रशासनाने कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली. सदरचा मोर्चा कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांतता प्रिय काढण्यात आला सदरचा मोर्चा कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे गणेश भोसले यांनी सांगितले यासंदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब यांनी सदर मागण्याचे निवेदन मोर्चात येऊन स्वीकारले व सर्व आरोपी व अप्रत्यक्षरीत्या मदत करणारे यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करू असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष दिपक भाऊ साठे, राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम, रोहन सुरवसे, टेंभुर्णी शहराध्यक्ष निलेश खरात, माढा तालुका अध्यक्ष आकाश भाऊ खंडाळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खंडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय उर्फ लल्लुभाऊ गायकवाड, महादेव कोळी संघटनेचे अध्यक्ष दीपक आबा लावंड, माळशिरस शहराध्यक्ष किरण तूपसुंदर रमेश कुचेकर, माळशिरस तालुका सचिव राहुल भोसले, माळशिरस तालुका अध्यक्ष आनंद दळवी, माळशिरस तालुका सरचिटणीस पोपट दळवी संगम शाखाध्यक्ष अंकुश चव्हाण, गणेश आव्हाड, लहू चव्हाण, गणेश खंडाळे, शंभू कुचेकर, आधी दलित महिला पुरुष युवक बहुजन समाज उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button