माळशिरस पिरळे येथील श्री संदिप वाघ यांच्या स्थावर मालमत्तेचा जाहीर निलाव



माळशिरस तालुक्याचे तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांनी दिनांक 25 9 2025 रोजी स्थावर मालमत्तेचा जाहीर निलाव काढण्यात आलेला होता .जाहीर निलाव प्रसिद्धीसाठी तहसील कार्यालय यांच्या निलावाचे पत्र आपण आमच्या चॅनला सादर केले होते.तरी तहसील ऑफिसच्या काही कारणामुळे त्या दिवशीचा निलाव रद्द करण्यात आला. व पुढील तारीख देण्यात आली. तरी होणाऱ्या निलावाची तारीख दिनांक 25 11 2025 रोजी संदीप रघुनाथ वाघ व रघुनाथ केरू वाघ यांच्या स्थावर मालमत्तेचा जाहीर निलाव होणार होता. तरी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रोटेक्शन न मिळाल्यामुळे तोही रद्द करून दिनांक 11 12 2025 रोजी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही निलाव करू असे मीडिया द्वारे सांगण्यात आले तसेच पत्र आमच्या चॅनलला प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे .तरी या निलावासाठी माळशिरस तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे.या निलावामध्ये भाग घेण्यात यावे तसेच हा निलाव फायदेशीर असणार आहे . असे कळवण्यात येते.